Our Aim


Our Aim

महामंडळाची उद्दिष्टे

 

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ही रजिस्टर्ड संस्था, गेली ३७ वर्षे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. ही महाराष्ट्रातील गणित शिक्षकांची संघटना असून ती प्राविण्य - प्रज्ञा परीक्षा व त्या परीक्षा संबंधीची मार्गदर्शक पुस्तके यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहूसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. वरील परीक्षांची गुणवत्ता महामंडळाने कायम ठेवल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनात या परीक्षांनी अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान प्राप्त केले आहे.

गणित हा विषय शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य असल्याने या विषयाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच गणित अध्यापक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.एम. एल. ओगले व पहिले संस्थापक कार्यवाह कै. श्री. पू. ग. वैद्य उर्फ भैया वैद्य यांनी अथक परिश्रम घेउन १९७६ मध्ये महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाची स्थापना केली. व त्या संस्थेमार्फत खालील उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

• विद्यार्थी, शिक्षक, पालक व सामान्यजन यांच्या मनात गणिताचा अभ्यास, गणितीय संशोधन आणि गणित शिक्षण या विषयी कुतूहल, आदर व आस्था वाढविणे

• गणिताचे अध्ययन, अध्यापन व संशोधन यांच्या विकासाचे कार्य करणे व अशा कार्यात सहभागी होणे.

• गणित विषयक सभा, परिषद, प्रदर्शने, मेळावे इत्यादी आयोजित करणे, भरविणे, पार पाडणे.

• अद्यावत गणित ज्ञान, ज्ञान प्रदान पद्धती, मुल्यांकन पद्धती इत्यादीची गणित शिक्षकांस माहिती होण्यासाठी अल्पकालिक,दीर्घकालिक अध्ययन वर्ग, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग, कृतीसत्रे, परिसंवाद इत्यादींचे आयोजन करणे व त्यांची कार्यवाही करणे.

• गणिताचा विकास, गणित अध्यापन व अध्ययन यांचा विस्तार होण्यासाठी पुस्तके, कालिके व अन्य प्रकारची प्रकाशाने प्रकाशित करणे, शैक्षणिक साधने तयार करणे आणि परीक्षा. स्पर्धा आयोजित करणे.

• गणिताचा व्यासंग वाढविण्यासाठी विविध कार्यप्रवृत्तीस मान्यता देणे व अशा प्रवृत्तीसाठी मान्यता मिळविणे.

वरील उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी परीक्षा समिती, प्रकाशन समिती, गणित शिक्षण समिती, विद्या समिती या महामंडळाच्या समित्या अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत.