गणित संबोध चाचणी (DISTRICT LEVEL)


आपले विद्यार्थी गणिताचे ज्ञान पायरी-पायरीने ग्रहण करतात. यातील एक जरी पायरी कमकुवत राहिली तरी त्यावर आधारित असलेले पुढील संबोध कळण्यात अडचणी निर्माण होतात.

संकल्पना शिडीच्या पायरी प्रमाणे एकावर एक आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक इयत्तेतील संबोध ज्या त्या इयत्तेत स्पष्ट असणे आवश्यक आहे. परंतु बहुसंख्य विद्यार्थ्यांचे ज्या त्या इयत्तेतील संबोध स्पष्ट नसल्याचे दिसून आले आहे.

इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांचे गणिती संबोध दृढ व्हावेत यासाठी जिल्हा मंडळ सदरची परीक्षा जिल्हा पातळीवर आयोजित करीत असते. या संबोध चाचणीचे आयोजन २० ऑगस्ट पर्यंत प्रत्येक जिल्ह्याने करावे असे महामंडळाचे धोरण आहे.

या संबोध चाचणीच्या मार्गदर्शनासाठी महामंडळाने “गणित संबोध मार्गदर्शिका” इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी ही दोन पुस्तके मराठी व इंग्रजी माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. त्याचा लाभ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी व शिक्षकांना झाला आहे.