गणित प्राविण्य परीक्षा (MATHEX - I LEVEL)


प्रज्ञा पूर्व तयारी म्हणून महामंडळ इथ्ता ५ वी ठ इयत्ता ८ वी च्या दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या रविवारी गणित प्राविण्य परीक्षा घेते. हि परीक्षा महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी (दुपारी १2 ते ३ या वेळेतो घेतली जाते. या परीक्षेकरिता जिल्हा मंडळाच्या नियोजनानुसार,

- विद्यार्थी संक्येच्या प्रमाणात एक अथवा अधिक केंद्रे असतील.

- प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वेगवेगळ्या राहतील.

- प्रश्नपत्रिका महामंडळाची परीक्षा समिती व उत्तरपत्रिका जिल्हा मंडळ पुरवील.

- या परीक्षेतून प्रज्ञा स्पर्धेसाठीनिवड झलेल्या विद्यार्थ्यांची नावे जिल्हा मंडळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संबंधीत कळठेल.

ही परीक्षा 1०० गुणांची असून वेळ तीन तास असतो. या परीच्या पर्शापात्रिकेत 1० प्रश्न असून प्रतयेक प्रश्न 1० गुणांचा असतो.

2 गुणांचे ७ प्रश्न,

3 गुणांचे 1० प्रश्न

४ गुणांचे ९ प्रश्न

5 गुणांचे ४ प्रश्न

असे एकूण असे ३० प्रश्न असतात.

या परीक्षेत विद्यार्थ्याला सुप्त गुण प्रकट करण्यास भरपूर वाढ असतो. कोणत्यही पद्धतीने (रीतीने) उदाहरणे सोडविता येतात.विचार करण्याचे व तो मांडण्याचे कौशत्य अजमावता येते. या परीक्षेसाठी उपयुक्त असणारी गणित प्राविण्य इयत्ता ५ वी गणित प्राविण्य इयत्ता ८ वी ही दोन पुस्तके महामंडळाने प्रकाशित केली आहेत.