जन्म दिनांक 7 /9/ 1951
शाळा :- सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी ता. फलटण, ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी व मालोजीराजे शेती विद्यालय फलटण, सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड व मुधोजी हायस्कूल फलटण येथे प्राचार्य म्हणून नियुक्ती व दिनांक 30 सप्टेंबर 2009 रोजी सेवानिवृत्त
1) राज्यस्तरीय व्याख्याते:- महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या मुंबई, इचलकरंजी ,सोलापूर, अमरावती, नांदेड ,जामनेर, वर्धा येथील अधिवेशनात व्याख्याते होते.
2) क्षमता धिष्टित चाचण्या निर्मिती कृती सत्रात सहभाग, भारतीय शिक्षण संस्था आयआयटी पुणे अंतर्गत कृती सत्रात सहभाग, अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती तसेच "आपणच "या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेचा सक्रिय सदस्य
3) अध्यक्ष महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ 1999 ते 2001
4) बालभारती पुणे येथे पुस्तकाचे परीक्षण व मूल्यमापन व एसएससी बोर्डाच्या इयत्ता नववी गणित पुस्तकाचे परीक्षण व मूल्यमापन केले.
5) पुरस्कार:- विज्ञान प्रेमी शिक्षक पुरस्कार सातारा जिल्हा, साखरवाडी ग्रामपंचायत, फलटण तालुका पंचायत समितीचा व सातारा जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, 2006-07 साली बॅ.पी.जी.पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार ,युनेस्को भारत सरकार तर्फे बेंगलोर येथे 2006 मध्ये भरलेल्या मूल्यशिक्षण वर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून निवड, एसबीएन चॅनलवर इयत्ता दहावी बीजगणित विषयाचे एक तास मार्गदर्शन या कार्यक्रमाचे सहा वेळा पुनरप्रक्षेपण, यशदा मध्ये महाराष्ट्रातील गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांना शाळा तपासणी व त्यातील मुद्दे यावर मार्गदर्शक म्हणून निवड
6) हसत खेळत गणिताचे व्याख्यान देणारे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध. |